Homeसिरोंचावनविभागाकडुन सागवान फर्निचरसह वाहन जप्त...

वनविभागाकडुन सागवान फर्निचरसह वाहन जप्त…

Advertisements

सिरोंचा :-वाहनातून अवैधरित्या सागवान फर्निचर वाहुन नेत असल्याचे निदर्शनास येताच फर्निचरसह वाहन जप्त केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी सिरोंचा तालुक्यातील धर्मपुरी वनोपज तपासणी नाक्यावर घडली.पहाटे ४:३० वाजताचे दरम्यान वनोपज तपासणी नाका, धर्मपुरी येथे वाहन क्रमांक एमएच३३-टी २१२३ आले असता या वाहनात सागवान फर्निचर आढळुन आले. तेव्हा वाहनचालक तथा वाहनमालक रवि मलय्या दुर्गम यांनी वाहतुक परवाणगी दाखवेली असता सदर वाहतुक परवानगी सिरोंचा त मरपल्ली पर्यंतची दिसून आली.

Advertisements

सदर माल अवैध असल्याची शहानिशा करून नाक्यावर कार्यरत वनपाल आर. व्ही. जवाजी यांनी सदर वाहन जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय, सिरोंचा येथे आणले असता चौकशी दरम्यान सदर माल अवैध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अहमद कासीमसाब मुल्ला, मलय्या दुर्गम मरपल्ली, सागर कोंडरे रा. उमानुर, फर्निचर मार्ट मालक श्रीनिवास कामडी यांच्याविरुद्ध वनगुन्हा जारी करण्यात आला.

वनाधिकाऱ्यांनी ५१२१६ रूपये किमतीचे फर्निचर तसेच ८,५०,००० रूपये किंमतीचे वाहन असा एकुण ९०१२१६ किमतीचा मुद्देमाल जप्त केला. उपवनसंरक्षक सुमितकुमार, सिरोंचाचे उपविभागीय वनाधिकारी प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एस. जी. बढेकर हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई सिरोंचाचे वनपरीक्षेत्राधिकारी कटकू क्षेत्रसहाय्यक आर. व्ही. जवाजी, जे.टी. निमसरकार, आदे, ए.पी. त्रिवेदी, हुसेन, महेश जवाजी, महेश मादरबोईना, किशोर जाधव, सुनिल कप्पालवार यांनी पार पाडली.

 

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!