रेगडी पोलीस मदत केंद्र येथे दादालोरा खिडकी अंतर्गत अनेक योजनाचे आयोजन… परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा – PSI शिंब्रे यांचे आवाहन…*

423

चामोर्शी: पोलीस मदत केंद्र रेगडी येथे पोलीस दादालोरा खिडकी या योजने अंतर्गत भव्य आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड तीन दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे
मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा.,मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे सा.,मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सा.,यांच्या संकल्पनेतून मा.उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा सा. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत पोलीस दादालोर खिडकीच्या ” माध्यमातून ‌आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे सदर मेळावा हा दिनांक 27 ते 29 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार असल्याचे पोलीस मदत केंद्र रेगडी चे प्रभारी अधिकारी एन. बी. शिंब्रे यांनी सांगितले असून रेगडी पंचकृषितील सर्व नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ही psi शिंब्रे यांनी केलं आहे.