दुर्गापूर पोलिसांची कोंबड बाजारावर धाड पाच आरोपींना अटक,दोन लाखाचा मुद्देमाल जप्त…

314

 

चंद्रपूर : दुर्गापूर पोलिस स्टेशन हद्दीतील वरवट शेतशिवारात कोंबडा बाजार सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून पाच आरोपींना अटक केली.यावेळी पोलिसांनी 1.99 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
मागील काही दिवसापासून दुर्गापूर पोलिस स्टेशन हद्दीतील ग्रामिण भागात कोंबड बाजार सुरू करण्यात आला होता. त्यामुळे दुरवरून शौकिन येथे येऊन कोंबडबाजार खेळत होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाड टाकली.त्यावेळी नंददीप विजय लोंखडे(30),महादेव कासवटे(26),राजकुमार खारकर(42)रा.खैरगांव,बालाजी वार्ड येथील रवि निंदेकर(30),दुर्गापूर वार्ड क्रमांक 3 येथील नाजीम छोटू शेख(19) आदींना अटक केली.

अभिमान रायपुरे रा.वरवट,फरार आहे. पोलिसांनी आरोपीकडून रोख 11 हजार 700 रूपये,1500 रूपयाचे 5 कोंबडे,कात्या रू.400रूपये,15हजार 500 रूपयाचे 3 मोबाईल,1.70 लाखाची तीन दुचाकी असा एकूण 1लाख 99 हजार 100 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पीएसआय स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरिक्षक प्रविण सोनोने,सुनिल गौरकार,अशोक मंजुळकर,जयसिंग जाधव,मनोहर जाधव व मंगेश शेन्डे आदींनी केली.