गोंडपिपरी पासून जवळच असलेल्या ग्रामपंचायत गोजोली येथे अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये पोषण माह अभियानाअंतर्गत कार्यक्रम राबविण्यात आला. कुपोषण हा भारताला लागलेला एक आजार आहे या आजारातून मुक्त होण्याकरिता पोषण आहाराची नितांत गरज असते ही जाणीव ठेवून तसेच शासनाचा एक उपक्रम म्हणून पोषण माह अभियान अंतर्गत आहाराचे प्रदर्शन करण्यात आले तसेच गरोदर व स्तनदा माता यांची गोजोली उपकेंद्रांमध्ये तपासणी करून त्यांना आहार,आरोग्य व स्वच्छता याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले अभियानाअंतर्गत एक रॅली काढून जनजागृतीही करण्यात आली. आरोग्यवर्धक खेळ घेऊन किशोरी मुलींचे वजन, उंची, हीमोग्लोबिन घेऊन त्यांना सकस आहार, आरोग्य व स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.गरोदर मातांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबद्दल माहिती देण्यात आली तसेच गोजोली उपकेंद्र येथे 30 वर्षा वरील सर्व नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये बीपी ,शुगर, कावीळ,तोंडाच्या आजाराची तपासणी तसेच स्त्रियांच्या गुप्त आजारांचीही तपासणी करण्यात आली. अशाप्रकारे अंगणवाडी क्रमांक 1,2,3 अंतर्गत पोषण माह कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
सदर कार्यक्रमाला कॅन्सर टाटा ट्रस्ट टीम च्या तज्ञांच्या व उपकेंद्र गोजोली येथील डॉक्टर अश्विनी आखाडे मॅडम ,आरोग्य सेविका अश्विनी खोब्रागडे, धाबा सर्कलच्या पर्यवेक्षिका ठेमस्कर मॅडम तसेच अंगणवाडी क्रमांक 1,2,3 च्या सेविका,मदतनीस, आशा वर्कर यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.






