Homeचंद्रपूरगणपती विसर्जनसाठी गेलेल्या तरुणांचा इरई नदीमध्ये बुडून मृत्यू..

गणपती विसर्जनसाठी गेलेल्या तरुणांचा इरई नदीमध्ये बुडून मृत्यू..

चंद्रपूर: गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या युवकाचा येथील इरई नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 20 सप्टेंबरच्या रात्री घडली. मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आला. प्रविण वनकर असे या युवकाचे नाव आहे.

19 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पोलिस कर्मचारी व मनपा कर्मचारी आपली सेवा देत होते. मात्र, विसर्जन आटोपल्यावर दुसर्‍या दिवशी ही दुःखद घटना घडली. चंद्रपूर शहरातील बोकारे प्लॉट रामनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी 19 सप्टेंबर अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन न करता दुसर्‍या दिवशी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोमवारी गणेश विसर्जन मिरवणूक काढत रात्री 9:30 वाजताच्या सुमारास हे मंडळ विसर्जन स्थळी पोहोचले.

या मंडळातील सदस्य विसर्जनाच्या निमित्ताने बाप्पाच्या मूर्तीसह नदीपात्रात उतरले. मात्र, त्यातील 3 सदस्यांचा तोल सुटला व ते प्रवाहात वाहू लागले. विसर्जनाच्या स्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोघांना कसेबसे वाचवले. पण, प्रविण हा नदीत खोल भागात बुडाला. रात्रभर या तरुणाचा नदीत शोध घेण्यात आला. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर मंगळवारी या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!