गोंडपिपरी(वार्ताहर)
तालुक्यातील फुलोरा हेटी येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक प्रशांत भंडारे यांना यावर्षीचा झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार प्राचार्य रत्नमाला भोयर नगराध्यक्ष मुल,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन सन्मान करण्यात आला.
मुळातच काव्यलेखन,चित्रकलेची आवड असणारे शिक्षक असून आतापर्यंतच्या त्यांच्या शैक्षणिक प्रवासात नाथ पंथीय 30 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून शालेय साधनाचे मोफत वितरण केले आहे.दरवर्षी रक्तदान शिवीरात सहभाग घेतात.युनिसेफ व भारत सरकार प्रणित खेळाद्वारे शिक्षण या उपक्रमात राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहे.
त्याच बरोबर दरवर्षी वृक्षारोपन व स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन शाळा व परीसरस सुशोभित केले आहे. त्यांचा कवडसा हा काव्य संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे .चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध गझलकार म्हणून नावलौकिक मिळविले आहे .या पूर्वी त्यांना शिव छत्रपती उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे .
त्यांच्या शैक्षणिक व साहित्य सेवेची दखल घेऊन झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरच्या वतीने झाडी शब्द साधक शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
प्रशांत भंडारे झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सन्मानीत
RELATED ARTICLES