गडचिरोली जिल्हा वर्धापन दिन स्पेशल…जिल्हा निर्मितीला झाले ३९ वर्षे पण विकास काही होईना…

1139

ब्युरोचिफ प्रशांत शाहा
गडचिरोली : प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्हा मार्गाशी प्रत्येक गाव जोडण्याचा उपक्रम शासन स्तरावरून राबविला जात आहे. मात्र, याला अपवाद गडचिरोली जिल्ह्यातील बरेच गावे आहेत. आज गडचिरोली जिल्ह्याचा वर्धापन दिन आहे.

विविध ठिकाणी वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मात्र, आदिवासीबहुल भागात स्वस्त धान्य आणण्यासाठी कुन्हाला ५ किलोमीटर तर कुन्हाला 12 किलोमीटर पायपीट करावा लागत असेल तर या जिल्ह्याचा विकास किती झाला याची प्रचिती येते.

जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील वेंगणुर आणि बोलेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत काही गावे आहेत,या गावांना जाण्यासाठी कन्नमवार जलाशयाच्या जलमार्गाचाच वापर करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात येथे नावेशिवाय पर्याय राहत नाही. ऐरवी उरते उन्हाळ्याच्या दिवसात ती केवळ पायवाट.

मुलचेरा तालुक्यात एकूण १६ ग्रामपंचायती असून वेंगुणर आणि बोलेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणारी काही गावे अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात वसलेली आहेत. तालुका मुख्यालयापासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वेंगणूर गावाला जाण्यासाठी चामोर्शी तालुका अंतर्गत येणाऱ्या रेगडी येथून जावे लागते. मात्र, नाल्यावर जवळपास अर्धा ते एक किलोमीटर कन्नमवार जलाशयाचे पाणी साचून राहत असल्याने प्रशासनाने दिलेल्या बोटीचा वापर करावे लागत आहे.

या दोन ग्रामपंचायत अंतर्गत पुल्लीगुडम, सुरगाव, अडंगेपल्ली, करमेटोला, पळकोटोला आणि वेंगणुर आदी गावांचा समावेश आहे. मात्र,पक्का रस्ता आणि नदी-नाल्यावर पूल नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्याच्या ४ ते ५ महिने जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही गडचिरोली जिल्ह्यात ही विदारक चित्र बघावयास मिळत आहे.

आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, ही निधी कुठे जात आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मोजके तालुके वगळल्यास बहुतांश तालुक्यात अजूनही विकासाचा सूर्य उगवला नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला आज ३९ वर्षे पूर्ण होऊनही ही विदारक चित्र असेल तर, जिल्ह्याच्या विकासाला किती चालना मिळाली यावरून याची प्रचिती येते.

*जिल्ह्यात एक मेव व सर्वात मोठा जलाशय म्हणून ओढकल्या जाणाऱ्या कर्मवीर कन्नमवार जलाशय रेगडी ची आहे बिकट परिस्थिती*
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून चामोर्शी तालुक्याची ओढक आहे. व जिल्ह्यातील केंद्र बिंदू मानल्या जाणाऱ्या रेगडी या गावात जिल्ह्यातील सर्वात मोठा व एकमेव जलाशय इथे आहे.

या जलाशयाची इतकी बिकट परिस्थिती आहे की,जलाशय निर्माण झाल्या पासून अजूनही इथे खोलीकरण व कालव्याचे दुरुस्तीकरन झाले नाही याला कारणीभूत कोण हा सवाल मात्र आम जनतेत निर्माण होत आहेत.

आमदार व खासदार नेहमी फक्त आश्वासन देत असतात परंतु या जलाशयाकडे कुणीही लक्ष देत नाही. मागील दोन वर्षांपूर्वी या जलाशयात वनविभागामार्फत लहान मुलांसाठी पार्क बनवण्यात आले. या पार्कला कर्मवीर कन्नमवार नाव देण्यात आले परंतु सध्या या पार्कची पण दुर्धवस्था पाहण्यास मिळत आहे