ब्युरोचिफ प्रशांत शाहा
चामोर्शी: तालुका मुख्यालय पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोधी गावापासून विसापूर, खोळदा, महालआमगाव या मार्गाची इतकी बिकट परिस्थिती झाली आहे की, या मार्गाने आवागमन करणे अश्यक झाले आहे. मागील काही वर्षांपूर्वी या मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले होते.
Advertisements
रस्त्याची दुर्धवस्था होन्याचे कारण राष्ट्रीय महामार्गाचा कामा करीता रेती वाहतूक करणाऱ्या मोठ मोठे ट्रकमुळे झाली आहे हे मात्र नक्की चामोर्शी गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून या मार्गावर रेती घाटातून रेती व याच परिसरतुन मुरूम वाहतूक केली गेली याचा फटका परिसरातील नागरिकांना बसला आहे.
संबंधित कंत्राकदार यांनी या रस्त्याची नूतनीकरण करून द्याव्ही अशी मांगणी विसापूर,खोळदा,महालआमगाव परिसरातील नागरिक करीत आहेत.