चेक दरूर गावातील रस्ते झाले चिखलमय…रस्त्यावरून वाहतूक करताना नागरिकांना होतो त्रास..ग्रामपंचायतचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

0
249

-शरद कुकूडकार प्रतिनिधी भंगाराम तळोधी

गोंडपीपरी – तालुक्यातील चेक दरूर येथील वॉर्ड न.3 येथील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून या रस्त्यावरून अवागमन करण्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

चेक दरूर येथील वॉर्ड न.३ येथील रस्त्याची मोठी दुर्दशा झाली असून या रस्त्या पूर्णतः चिखलमय झालेला आहे.
सदर मार्ग हा वॉर्डातील मुख्य मार्ग असल्याने नागरिकांना चिखल तुडवत अवागमन करावे लागते आहे. याकडे स्थानिक ग्रामपंचायत पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामपंचायतिच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे.

मागील चार- पाच वर्ष पासून सदर रस्ता आहे अश्याच स्तिथीत आहे. सदर रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकरवी जोर धरू लागली आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात हा मार्ग त्रासदायक ठरत आहे.
निवडणूका आल्या आणि गेल्या..

सरपंच येतात आणि जातात पण गावाच्या विकासाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सदर मार्गावर सिमेंट-काँक्रेट चे पक्के बांधकाम करन्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here