सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा

462

लाखनी :- येथील सार्वभौम युवा मंच जिल्हा भंडारा चे सल्लागार प्रा.विजय रंगारी यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे रुग्णांना फळवाटप , ग्रा.सिल्ली येथील बुद्ध विहारात वृक्षारोपण आणि भंडारा येथील महाबोधी शिक्षण संस्था संचालित दादाजी वृद्धाश्रम येथे वृद्धांना भेट देत त्यांच्या सोबत केक कापून विविध सामाजिक उपक्रम राबवित वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस आला की केक कापून त्याने तोंड रंगविण्याची व मनसोक्त पार्टी करण्याची पद्धत आजच्या तरुण पिढीत आहे. परंतु आपले सुद्धा समाजाशी काही देणे घेणे असते , हे लक्षात ठेवता प्रा.विजय रंगारी यांनी आपला वाढदिवस ह्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले.
वृद्धाश्रम येथील कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष दिपक जनबंधु यांनी प्रा.विजय रंगारी यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकत सांगितले की ज्या कठीण परिस्थिती मध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले त्याची जाणीव त्यांना आहे, विद्यार्थी चळवळ तसेच शिक्षण क्षेत्राशी जुडून असल्यामुळे ते नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. वृधश्रमाचे संचालक मनोहर गणवीर यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अश्या प्रकारचे उपक्रम राबविणे इतरांसाठी आदर्श असते असे मार्मिक प्रतिपादन करीत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ह्या प्रसंगी प्रा.विजय रंगारी यांनी वृद्ध नागरिक यांच्या सोबत केक कापून वाढदिवस साजरा केला आणि सर्वांना नाश्ता, फळ , बिस्कीट आदी वाटप करण्यात आले.
ह्यावेळी संघटनेचे सल्लागार प्रा.विजय रंगारी, अध्यक्ष दिपक जनबंधु, महासचिव नेहाल कांबळे, सचिन रामटेके, सोहेल खान, आकाश जनबंधु, मंगेश गेडाम, चेतन खोब्रागडे, आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.