अडेगाव येथे स्मार्ट काॅटन अंतर्गत कापूस पिकाची शेतीशाळा आयोजित…

0
306

शरद कुकूडकार प्रतिनिधी

आज दि. १६ ऑगस्ट 2021 रोजी श्री चंपत देवाजी ठाकुर यांच्या नियोजित शेतीशाळा प्लॉट मध्ये स्मार्ट कॉटन अंतर्गत कापुस पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती , यामध्ये शेतातील कापूस पीक परिसंस्था निरीक्षणे शेतकऱ्यांना मित्र कीड ,शत्रु कीड याबाबत ओळख करून देण्यात आली.

कापूस पिकावरील बोड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन विशेष करून गुलाबी बोन्ड अळीचे पिकावरील नुकसान व त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर विशेष विषय घेण्यात आला. तसेच फेरोमेन ट्रॅप बाबत माहिती देऊन ते लावण्याचे प्रात्यक्षिक द्वारे समजावून सांगण्यात आले व शेतात लावून दाखवण्यात आले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता शेतीशाळेत मंडळ कृषि अधिकारी श्री गोल्हाईत साहेब उपस्थित राहून एकात्मिक खत व्ययस्थापन बाबत माहिती दिली , तसेच श्री टोंगलवार कृषि पर्यवेक्षक यांनी कापूस पिकावरील बोन्ड अळीचे व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच श्री पेंदोर कृषि सहाय्यक यांनी शेतीशाळेचे आयोजन करून फेरोमेनट्रॅप बाबत माहिती प्रात्यक्षिक व कापूस पिक परिसंथा निरीक्षणे बाबत शेतकऱ्यांना अवगत केले या शेतीशाळे च्या आयोजनासाठी कृषि मित्र श्री भगीरथ नागापुरे यांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here