गोंडपिपरी :– तालुक्यांतील मौजा वेडगाव येथील शेतात डवरनी करीत असतांना वीज कोसळल्याने दोघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची आज दुपारचा सूमारास घडली. सदर घटनेत एका महिलेसह पुरुषाचा समावेश असून या घटनेची माहिती मिळताच क्षेत्र आ. सुभाष धोटे यांनी या दोन्ही मृतांच्या पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दोन्ही कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून वैयक्तिक रीत्या आर्थिक मदत दिली. आणि वीज पडून मृत्यू झाल्याने शासनाकडून मिळणारी सर्व प्रकारची मदत तातडीने मिळवून देण्याची हमी दिली. दोन्ही पिडीत कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथिल रेखा अरूण घूबडे यांनी सहा एकर शेती ठेक्याने घेतली. गावापासून जवळच असलेल्या शेतात कापूस पिक उभे आहे. शेतात डवरण करण्यासाठी रेखा घुबडे यांनी गावातील मारोती चौधरी याला बोलाविले. सोबतच दोन मजूर शेतात काम करीत होते. अंदाजे तीन वाजताचा पावसाचे वातावरण झाले. याच दरम्यान शेतात विज कोसळली. या घटनेत रेखा घुबडे, मारोती चौधरी यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच क्षेत्र आ. सुभाष धोटे यांनी या दोन्ही मृतकांच्या पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि मदत कार्य तातडीने करण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले. याप्रसंगी प्रामुख्याने नायब तहसीलदार जमदाळे यांनी मोका पंचनामा केला. या प्रसंगी उपस्थित नायब तहसीलदार प्रवीण जामदाळे, सरपंच धीरेंद्र नागापुरे, अशोक रेचनकर, नामदेव सांगळे, अनिल कोरडे, संतोष बंडावार, अशोक राऊत, श्रावण किरमिरे, अंबादास चीमुरकर, पुरुषोत्तम चौधरी,रवी मडावी, दिलीप कोसरे,गणेश जेणेकर, वेळगाव येथील गावकरी उपस्थित होते.
Advertisements
आमदार सुभाष धोटे यांनी केले वीज पडून मृत्यू पावलेल्या पिडीत कुटुंबियांचे सांत्वन…
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements