Advertisements
-गौरव लुटे
आरमोरी तालुका प्रतिनिधी
Advertisements
आरमोरी – सध्या पावसाळा सुरू असुन शहराच्या काही भागात डासांचे प्रमाण वाढत आहे.आधीच कोरोणामुळे धास्तावलेल्या नागरिकांमध्ये आता साधा जरी ताप आला तरी भितीचे वातावरण पसरले आहे. डास, किटकांमुळे नागरिकांच्या
आरोग्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे.तसेच शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा साठा वाढला आहे.मुख्यता ही जनावरे मुख्य मार्गावर येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.यामुळे छोटे मोठे अपघात घडू शकतात.
शहरात डास व कीटकनाशक फवारणी आणि मुख्य मार्गावर असलेल्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत आरमोरी युवक काँग्रेस चे सारंग जांभुळे यांनी शहरातील नागरिकांसमवेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
निवेदन देताना साबीर शेख ,प्रीतम धोडने ,तसेच नागरिक गोलू डोंगरवार , उमेश इंदूरकर , हर्षल तिरंगम उपस्थित होते.
Advertisements
Advertisements