जिवती तालुक्यातील पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मदत कक्षाचे उद्घाटन..मदत कक्षातून मिळेल रुग्णांना रुग्णालयातील सेवा व इतर योजनेची माहिती…

0
64

दिपक साबने,जिवती
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व स्टॅपी संस्था पुणे यांच्या सहकार्याने व प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूर द्वारा प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे संवाद व मदत कक्षाचे उद्घाटन सुषमाताई मडावी, सरपंच पाटण यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्याच्या काळात सर्व शासकीय रुग्णालयात कोविड – १९ च्या संदर्भात सेवा देण्यात व्यस्त आहेत अशा अटीतटीच्या काळात शासकीय आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेत येणाऱ्या रुग्णास योग्य माहिती मिळवून देण्याच्या सकारात्मक हेतूने संवाद व मदत कक्षाचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात बोलताना डॉ स्वप्नील टेंभे यांनी सांगितले की, मदत कक्ष स्थापन झाल्यामुळे नागरिकांना लसीकरणविषयी समज गैरसमज, कोविड-१९ विषयी माहिती तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना , प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मातृवंदन योजना, जननी सुरक्षा योजना व रुग्णालयातीलसेवा सुविधा इत्यादी विषयक माहिती, सल्ला व मार्गदर्शन या केंद्रातून प्राप्त होईल असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी गोदावरीताई सुरेश केंद्रे, जिल्हा परिषद सदस्या, डॉ स्वप्नील टेंभे, तालुका वैधकीय अधिकारी, डॉ कविता शर्मा मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, गारुळे सर ,सी डी पी ओ मा जे बी पंचायत समिती जिवती,राजेंद्र बांबोळे,आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती,जिवती , निलेश देवतळे, संचालक ,
रुग्णकल्याण समिती सदस्य सिताराम मडावी, भिमराव पवार, अनिल काटे, सुरेश केंद्रे, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश देवतळे, जिल्हा समन्वयक प्रकृती महिला विकास केंद्र, चंद्रपूर यांनी केले,संचालन
शाहीर संभाजी ढगे, तालुका समन्वयक,जिवती, प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिलवंत गायकवाड यांनी केले.
सदर मदत कक्ष सुरू करण्यास संतोष चतरेश्वर, रुग्ण कल्याण समिती जिल्हा समन्वयक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here