Advertisements
चंद्रपूर: सरदार पटेल महाविद्यालय,चंद्रपूर आणि युवक बिरादरी (भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने 2 बिघा जमीन या उपक्रमाअंतर्गत सरदार पटेल महाविद्यालयात “युवकांचा शेती आणि शेती व्यवसाय” या विषयांवर चर्चासत्र पार पडले.
Advertisements
या चर्चासत्रात विविध महाविद्यालयाचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपआपले मत व्यक्त करून छान प्रकारे चर्चा घडवून आणली. हे चर्चासत्र कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश इंगोले, युवक बिरादरी (भारत) चे प्रकल्प संचालक युवक प्रशांत सुरेश वाघाये, शुभस्नेही नितीन पुगलीया, प्रा.बेले, प्रा. गोंड आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
Advertisements
Advertisements