Home चंद्रपूर जिवती इग्नू ने सुरू केलेला फलज्योतिषचा पाठ्यक्रम त्वरित बंद करावा-अभाअंनिस, जिवती...#ज्योतिष्यशास्त्राची मास्टरकी कोणासाठी...

इग्नू ने सुरू केलेला फलज्योतिषचा पाठ्यक्रम त्वरित बंद करावा-अभाअंनिस, जिवती…#ज्योतिष्यशास्त्राची मास्टरकी कोणासाठी ? कशासाठी?…अंधश्रद्धा निर्मूलन समिती,जिवती च्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन…

दिपक साबने,जिवती
यावर्षीपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली (इग्नू) ने फलज्योतिषचा पाठ्यक्रम पदविका,पदवी तथा पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. खगोल शास्त्रज्ञ फलज्योतिषाला मान्यता देत नाहीत. फलज्योतिषाचा अभ्यासक्रम भारतीय संविधानाच्या तत्वांना छेद देणारा व अवैज्ञानिक गोष्टीचे समर्थन करणारा असल्यामुळे तो ताबतोब बंद करावा अशा आशयाचे निवेदन अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा जिवती च्या वतीने देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार तहसील कार्यालय,जिवती यांच्या मार्फत देण्यात आले.
महाराष्ट्राला संतांची आणि समाज सुधारकांची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे.आपल्या भूमीचा बुद्धीच्या देशा असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामी पासून ते थेट संत गाडगे बाबा पर्यंत प्रबोधनाची परंपरा लाभलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले पासून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत समाज सुधारक होऊन गेले आहेत. या संतांची तथा थोर पुरुषांची परंपरा चालू ठेवणे हे प्रत्येक महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य आहे .
ज्योतिषशास्त्राचा पाठ्यक्रम शिकून महाराष्ट्रामध्ये कर्मकांड करणारे, आपला वेळ, पैसा आणि श्रम वाया घालवणारे तरुण युवक तयार होतील. समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल. हे थांबविण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावरील देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदने देण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जिवती च्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी राजकुमार चिकटे, अध्यक्ष, अ भा अं नि स, जिवती, दिपक साबने, सचिव, अ भा अं नि स, जिवती, बळीराम काळे,सह संघटक, संभाजी ढगे, संघटक , संदीप घुक्से, कोषाध्यक्ष, दयानंद कोमले, मोहन राठोड इत्यादी सदस्य उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ; अनेक घरांची उडाली छपरे…रस्त्यांवरील दुकाने, प्रवासी व शेतकऱ्यांची एकच तारांबळ

बळीराम काळे/जिवती जिवती : रविवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह तालुक्यात पाऊस बरसला. याचा माराई पाटण, टेकामांडवा, हिमायतनगर, शेणगाव, टेकाअर्जुनी, धोंडाअर्जुनी, देवलागुडा, येल्लापूर, पालडोह...

आदिवासी सोसायटीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीचा झेंडा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चा सुफडा साफ

बळीराम काळे/जिवती जिवती: आदिवासी विविध सहकारी कार्यकारी संस्था, जिवती येथील झलेल्या निवडणुकीत गोंडवाना प्रनित पॅनलच्या १३ पैकी १३ उमेदवारानी दणदणीत विजय प्राप्त करत काँग्रेस, राष्ट्रवादी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

यूजीसी नेट’च्या अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा....

राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे) येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

Recent Comments

Don`t copy text!