जागतिक आदिवासी दिनानिमित्त “विकास आदिवासींचा वेध भविष्याचा” या विषयावर व्याख्यान…

0
84
Advertisements

चंद्रपूर : 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने नागपूर, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आदिवासी समाजामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून तसेच शासनाच्या योजनांच्या माध्यमातून “विकास आदिवासींचा वेध भविष्याचा”या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून लक्ष्मणराव इन्स्टिट्यूट ट्रेनिंग नागपूरचे माजी प्राध्यापक तथा संशोधक(यु.एस.ए) डॉ. भास्कर हलामी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक (इतिहास विभाग प्रमुख) तथा जवाहर नेहरू विद्यापीठ दिल्लीचे माजी विद्यार्थी डॉ.शामराव कोरेटी, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. केशव वाळके, लोकांचे सामुहिक केंद्र, नागपूरचे संचालक प्रवीण मोटे आदी मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सदर व्याख्यान यूट्यूबच्या माध्यमातून दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता https://www.youtube.com/watch?v=qydlK9m7ytk या लिंकद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे. तरी,सदर व्याख्यानाचा आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.असे आवाहन चंद्रपूर,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे तसेच चिमूरचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी केले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here