पं. स. जिवती येथे ग्रामसेवक संघटनेचे काळ्या फिती लाऊन धरणे आंदोलन..

0
119

दिपक साबने,जिवती

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा जिवती यांच्या वतीने पंचायत समिती जिवती येथे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काळ्या फिती लाऊन धरणे आंदोलन करण्यात आले.
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना राबविणारा ग्रामसेवक हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आसून गाव विकासाची धुरा सांभाळून विकास कामात महत्वाची भूमिका बजावत असतो.परंतु गाव गाड्याच्या राजकारणात नेहमी ग्रामसेवक भरडला जात असून त्यातूनच त्याला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, धमक्या देने, अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार होत आहेत.
वरोरा तालुक्यातील अटमुरडी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक गोपीचंद खानेकर या ग्रामसेवकाला ग्रामपंचायत मध्ये गावातील व्यक्ती कडून मारहाण करण्यात आली तेंव्हा संबधीत आरोपी वर गुन्हा दाखल होऊन सुद्धा अद्यापर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नाही या घटनेच्या निषेधार्थ जिवती तालुका ग्रामसेवक संघटने कडून काळ्या फिती लाऊन निषेध नोंदविण्यात आला तसेच आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणी साठी तालुका संघटनेच्या वतीने तहसीलदार साहेब जिवती व गट विकास अधिकारी साहेब जिवती यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष, लक्ष्मण मिसाळ, संघटनेचे सचिव, बाबाराव पोडे, संजय आत्राम, ,विनोद शेरकी, सचिन आदे, संजय ढोने, प्रकाश बोरचाटे, विजय पचारे, पुरुषोत्तम मिश्रा, प्रफुल गायकवाड, प्यारेलाल दहिवले, कु शालू शेडमके, कु स्मिता वऱ्हाडे,सुनील बांगरे, संजय आडे, सचिन राऊत इत्यादी व इतर ग्रामसेवक बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here