पोंभुर्णा प्रतिनिधी :- पोंभुर्णा शहरात रमाई,शबरी,व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचे घरे मागील दोन वर्षांपासून निधी अभावी अर्धवट असुन गरीबांच्या स्वप्नातील घर पुर्ण होताना दिसत नाही. यामुळे कुणी किरायाने तर कुणी झोपडी मध्ये आपले रहाटगाडगे चालवत आहेत.गरीब असल्याने ते आपले घर बांधु शकत नाही त्या गरीब लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान निधी देण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा ने मुख्याधिकारी पोंभुर्णा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नगरपंचायत पोंभुर्णा ने लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला आहे.त्यामुळे लोकांनी आपल्या झोपड्या तोडुन घरे बांधायला सुरुवात केली.मात्र उर्वरित निधी मिळत नसल्याने घरकुलाचे कामे रखडली आहेत. लाभार्थ्यांना सुरवातीला काही रक्कम मिळाली होती.पण कोरोणा काळात रक्कम जमा झाली नाही.आधीच कोरोणाच्या संकटाने गोरं गरीब कुटुंब उघडल्यावर पडले आहेत.लॉकडाऊन च्या काळात लोकांचा रोजगार हिरावला आहे. सामान्य माणूस हा यामुळे मेटाकुटीस आलेला आहे.त्यामुळे रमाई,शबरी, पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरीत निधी देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.जर येत्या आठ दिवसात लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान मिळाले नाही तर लाभार्थ्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी तालुका पोंभुर्णा नगरपंचायत ला घेराव घालणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे…।
सदर निवेदन देताना चंद्रहास उराडे तालुका अध्यक्ष,राजु खोब्रागडे शहराध्यक्ष,अतुल वाकडे तालुका युवा अध्यक्ष, अविनाश वाळके जिल्हा प्रमुख आय टी सेल चंद्रपूर, रुषीजी गुरुनुले, युनिल मानकर, निश्चल भसारकर, शशीकांत उराडे, पराग उराडे, सुमित मानकर, व वंचित बहूजन आघाडी तालुका/शहर शाखा पोंभुर्णा चे पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते…।
रमाई,शबरी, पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरीत निधी देण्यात यावा अन्यथा लाभार्थ्यांना घेऊन नगरपंचायत पोंभुर्णा चा घेराव घालणार…वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे मुख्याधिकारी यांना निवेदनातून इशारा…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
RELATED ARTICLES