संदीप करपेंचा कुपोषण निर्मूलनाचा प्रयत्न प्रेरणादायी

0
205

गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी

काही माणसांना समाजातील लोकांचे दुःख लवकर टिपता येते.त्यांना समाजाविषयी आपुलकी असते.आदर असते.त्या दृष्टिकोनातून ते कार्य करत असतात.असेच तालुक्यातील एक व्यक्तिमत्व जी.प माजी उपाध्यक्ष,शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदीप करपे.वाढदिवसानिमित्त सामाजिक भावनेतून बाळू संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत शहरातील २६ कुपोषित बालकांना कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून पोषण आहार वितरित केले.

सोबत गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सूरज माडूरवार,प्राचार्य पोटवार,बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद पारखी ,राजू झाडे, हरमेलसिंग डांगी,शैलेश भैस,आनंदराव गोहणे,बबलू पठाण,अशपाक कुरेशी,विवेक राणा,रमेश नायडू,तुकाराम सातपुते,केतन भोयर,बळवंत भोयर,उमेश उपासे,शंभरकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अनिकेत दुर्गे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here