महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, चंद्रपुर तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..# पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दाखवली साहित्य नेणाऱ्या ट्रकला हिरवी झेंडी..

477

चंद्रपुर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, सर्व तालुका स्तरीय महिला काँग्रेस कमिटी द्वारा एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून जनसहभाग आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या.

त्या सर्व साहित्यांचे एकत्रिकरण करून, त्यांना व्यवस्थितपणे अन्नधान्य किट तयार करून जीवनावश्यक वस्तूंचे हे कीट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले.

या गाडीला आज चंद्रपूर येथे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार आणि आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी हिरवी झंडी दाखवून ते साहित्य रवाना केले. या प्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर, पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्राताई डांगे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.