अभिनंदन! आर.आर. पाटील सुंदरगाव पुरस्कारात जिल्ह्यात सोनापुर देश. ग्रामपंचायतअव्वल..

0
311

गोंडपिपरी : चंद्रपूर जिल्ह्यात 2020–21 या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेचा निकाल जाहीर झाला असून,
जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर देशपांडे ग्रामपंचायतीने पटकावला आहे.

जिल्ह्यातील 15 पंचायत समिती मधील 15 ग्रामपंचायतींचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. तालुकास्तरावर घोषित करण्यात आलेल्या आर आर (आबा) पाटील सुंदर ग्रामपंचायत पुनर्मूल्यांकन व तपासणी करण्यात आली असता तालुक्यातील ग्रामपंचायतीला खालील प्रमाणे गुण प्राप्त झालेले आहेत.

गोंडपिपरी–सोनापुर देश –76.00

मुल – मारोडा –70.50

पोंभूर्णा – जामतुकुम – 69.00

सिंदेवाही – टेकरी – 61.00

चंद्रपूर-पायलीभटाळी-59.50

सावली – निमगाव – 57.00

ब्रह्मपुरी – आक्सापुर – 55.50

राजुरा- खामोना – 55.00

भद्रावती – भटाळी – 49.50

वरोरा – जामखुला – 48.50

चिमूर – सिरपुर – 48.00

नागभीड – पांजरेपार – 46.00

जिवती – पूनागुडा – 40.50

कोरपना – सोनुरली – 40.50

बल्लारपूर – बामणी – 40.00

या 15 तालुक्यांतील ग्रामपंचायतींमधून गोंडपिपरी तालुक्यातील *सोनापूर देशपांडे* येथील ग्रामपंचायतीला 76 गुण मिळाल्याने जिल्हा पातळीवर ही ग्रामपंचायत अव्वल ठरली आहे. सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा निकाल जाहीर केल्याचे सरपंच जयाताई दीपक सातपुते यांनी स्पष्ट केले आहे. या पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना आर. आर.(आबा) पाटील सुंदरगाव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here