भद्रावती : कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र भद्रावतीकरण या नियमांना तिलाजंली देत असून विना मास्क शहरात फिरत असल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक या संख्येत वाढ होत आहे.
भद्रावती तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. परंतु भद्रावतीकर बेफिकीरीने वागत आहेत. शहरात अनेक ठिकाणी गर्दी दिसून येते. त्यातही अनेकजण मास्क घालत नसल्याचे दिसून येते.
नगरपालिका, तहसील कार्यालय तसेच पोलीस प्रशासनाची कारवाई थंडावली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठ, बँक, सरकारी कार्यालय परिसरात अनेकजण विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे अशावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






