HomeBreaking Newsचंद्रपुरात भोजनालय चालवणाऱ्या संचालक दाम्पत्याची आत्महत्या.. कुजलेल्या अवस्थेत आढळले मृत्युदेह...

चंद्रपुरात भोजनालय चालवणाऱ्या संचालक दाम्पत्याची आत्महत्या.. कुजलेल्या अवस्थेत आढळले मृत्युदेह…

चंद्रपूर : चंद्रपुरात भोजनालय चालवणाऱ्या संचालक दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर असलेल्या भोजनालयातच गळफास घेतलेल्या अवस्थेत दुबे दाम्पत्याचे मृतदेह आढळले. मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्येच्या तीन-चार दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली.

नेमकं काय घडलं?

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर माँ ममता भोजनालय आहे. या भोजनालयाचे मालक चंद्रभान दुबे (60 वर्ष) आणि त्यांची पत्नी मंजू दुबे (50 वर्ष) यांनी आत्महत्या केली. दोघांचेही मृतदेह भोजनालयातच आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत

भोजनालयाच्या लगतच्या टॉवर टेकडी, जुनोना रोड बाबुपेठ येथे दुबे दाम्पत्याचे वास्तव्य होते. भोजनालयात गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळले. त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने ही आत्महत्या 3 ते 4 दिवसांपूर्वी केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. चंद्रपूर शहर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!