चामोर्शी शहरातील विविध प्रभागातील प्रलंबित विकास कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावी- आमदार डॉ देवराव होळी..

446

चामोर्षी – दिनांक 24 जुलै 2021 ला येथील विविध प्रभागातील विकास कामांची पाहणी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी व भाजप पदाधिकारी प्रतीक राठी जयराम चलाख यांनी केली.शहरात सध्या विविध प्रभागातील प्रलंबित विविध विकास कामांचा आढावा प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या जागेवर जाऊन घेतला.

यावेळी बोलतांना आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले नगर पंचायत द्वारे सुरू असलेले समस्त विकास काम दिलेल्या निहित वेळेत पूर्ण करण्यात यावी अन्यथा सबंधित काम करणारी एजांसी यांच्यावर कारवाई करून त्या एजन्सी चे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावी असे प्रतिपादन केले व नॅशनल हायवे वर सुरू असलेल्या कामाला पुन्हा गती देऊन शहरातील मुख्य मार्गाचे काम युद्ध स्तरावर पूर्ण करण्यात यावी असे निर्देश दिले.

नगर पंचायत द्वारे सुरू करण्यात आलेल्या कोणत्याही विकास कामात अनियमितता खपवून घेणार नाही असे सांगितले. यावेळी प्रामुख्याने येथील कंत्राटदार लोकेश सावकार शातलवार , महेश भाऊ मारकवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.