Advertisements
गोंडपीपरी: तालुक्यात तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदिच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम गोंडपीपरी तालुक्यातील अडेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेत पिकाला बसला आहे.
नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने नदी काठलगतच्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली कापूस, सोयाबीन आदी पिक पाण्याखाली आले. वर्धा धरणात पाण्याची पातळी वाढल्याने नदीला पूर आला आहे.
नदीकाठी वसलेल्या गावांना तालुका प्रशासनाद्वारा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर मासेमारी करण्याऱ्याना नदीत न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नदीला आलेल्या पुराने नदी काठ परिसरातील लागवड केल्या कापूस, सोयाबीन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
Advertisements
Advertisements
Advertisements