भद्रावती : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पाऊसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना शेतकऱ्यांच्या शेतातील ऊभे सोयाबीन पीक नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने खरवडून नेल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Advertisements
अस्मानी, सुलतानी संकट आले की पहिले त्याची झळ हि बळीराज्याला सोसावी लागते. मग कोरडा दुष्काळ असो की ओला उष्काळ असो, पाऊस आला तरी नाही आला तरी संकटाला तोंड देण्याची हिंमत शेतकऱ्यांना दिली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पाऊसाने भद्रावती तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे.
अशीच परिस्थिती बहुतांश ठिकाणी झाली असून काही ठिकाणी पीक पाण्याखाली गेले आहे तर काहो पिकांवर मातीचे थर साचले आहे, यामुळे तात्काळ प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.