कार चोरी करणा-यास 24 तासात अटक…

0
246

चंद्रपूर-नागपूर मार्गावरील चांदा मोटर्स या दुचाकी व चारचाकी वाहन विक्री दुकानाच्या पार्किंग मधून 18 जुलै रोजी इर्टीगा चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. 04. एफ. झे. 5290 किंमत 3 लाख 50 हजार रुपयाची कार चोरी करण्यात आली होती.

चांदा मोटर्सचे आरिफ खान मकसूद खान पठाण यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार केली. दरम्यान गुन्हे शोध पथकाचे सपोनि अब्दुल मलिक यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून 24 तासाच्या आरोपीस अटक केली.

या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून चोरी गेलेले चारचाकी वाहन, दुचाकी वाहन व 2 मोबाईल असा एकूण 4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींमध्ये रोहीत सिध्दार्थ जांभुळकर 29 वर्ष रा. जुनोना चौक, साईनगर यादव किराण स्टोअर्स जवळ, बाबुपेठ वार्ड, अंकित प्रदीप नागापुरे 21 रा. सावरकरनगर, दुध डेअरी, चंद्रपूर यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here