अवैध दारूविक्री करणाऱ्या सात जणांवर गुन्हे दाखल…

596

देसाईगंज : शहरासह परिसरातील गावांमध्ये पोलिसांनी बुधवारी केलेल्या कारवाईत अवैध दारू विक्री करताना आढळून आलेल्या सात आरोपींवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून एकूण ११ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाई केलेल्या आरोपींमध्ये कुरूड येथील रामभाऊ तुळशीराम मेश्राम (वय ५२), कुणाल प्रभाकर ठाकरे (३०), कोकडी येथील संघपाल रतन मेश्राम (२९), देसाईगंजच्या
शिवाजी वॉर्डमधील गजानन लक्ष्मण कोडापे (५५), एक महिला आरोपी, भगतसिंग वॉर्डातील मनोज जनार्दन गणवीर (४५), भगतसिंग वॉर्डातील राजेंद्र बाळकृष्ण सिडाम (४७), आदींचा समावेश आहे.
त्यांच्याकडून एकूण ११ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई देसाईगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने केली. दोन दिवसांपूर्वी जुगारावर अशीच कारवाई केली होती.