उखर्डा ते नागरी हा जवळपास तीन की.मी.अंतराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत , त्यामूळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा तर लागतोच परंतु,पायदळ व्यक्तींना या रस्त्यावरून चालतांना नाहक त्रास सहन करावा लागतो.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ता तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे यांनी आमदार व बांधकाम विभागाकडे निवेदन सादर केली परंतु, आजतागायत या रस्त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही . रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची साधी तसदी लोकप्रतिनिधींनी दाखविली नाही .त्यामुळे उखर्डा वासियांचां जीव धोक्यात आला असून हे खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे.
या रस्त्याच्या खड्ड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे , त्यामुळे बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी रस्त्यातील खड्डात भजन आंदोलन करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचेकडे उखर्डा- नागरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.यासाठी निवेदन सादर केली. यापूर्वी उखर्डा येथील रस्त्यांच्या खड्ड्यावर बेशरमाची झाडे लावून आंदोलनं करण्यात आले होते त्या नंतर प्रशासनाने तात्पुरते मुरूम टाकून ठेवला आहे पण अजून पर्यंत तो मुरूम खड्डात पडला नाही , त्या नंतर त्या खड्डात दिवे लावुन दिवाळी साजरी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला साद घालण्यात आली , बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटुन चर्चा करून निवेदन दिली . या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे , खड्डात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत हे देखील समजतं आहे , पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे खड्डात पाणी साचले आहे . रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून,अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे एक तर नव्याने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे,अन्यथा खड्डे बुजविण्यात यावे . अशी अन्यथा वरोरा येथे आंदोलन छेडण्याचा इशारा अभिजित कुडे यानी दिला आहे , निवेदन देउन या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग येत नाही त्यामूळे याना धारेवर धरल्याशिवाय पर्याय नाही . लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी केली अभिजित कुडे यांनी केली आहे. यावेळी रुपेश पाल , रंजीत कुडे , साहिल पानतावणे , कृष्णाजी कुचनकर, विजय कुडे , अतुल कोठारे, ऋषिकेश कूडे , राहुल कूडे , योगेश पुसदेकर , प्रशांत कुडे , निखिल पाचभाई , तेजस ऊरकूडे व नागरीक उपस्थित होते.
Advertisements
उखर्डा ते नागरी रस्त्यातील खड्डात भजन आंदोलन…उखर्डा-नागरी रस्त्याची दयनीय अवस्था
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements