कमलापूरचा हत्ती कॅम्प घालतोय पर्यटकांना भुरळ…

0
268

प्रितम गग्गुरी (प्रतिनिधी)

कमलापूर: निसर्गरम्य वातावरण, दुर्गम आणि सभोवताल डोंगराळ भाग अशा आनंदमय वातावरणात हत्ती कॅम्प वसलेले आहे. सध्या पावसांचे दिवस आहेत. हिरवेगार झाले आहे. निसर्गरम्य वातावरण व शुद्ध हवा यांचा आस्वाद घेण्याकरिता शहरी भागातील अनेक पर्यटक हत्ती कॅम्पला येऊन आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.

कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये सध्या १० हत्ती आहेत. एवढे हत्ती नैसर्गिक वातावरणात दुसरीकडे कुठेच नाही. त्यामुळे पर्यटकांसाठी हे एक आकर्षण आहे. गडचिरोली जिल्ह्यात येणारे पर्यटक हत्ती कॅम्पला आर्वजून भेट देत असून पर्यटकांची संख्या वाढतच आहे.

कोरोनाच्या कालावधीत हत्ती कॅम्पला भेट देणाऱ्यांची संख्या अधीक्क् झाली आहे. तसेच लॉकडाऊनच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून घरी बसलेले पर्यटक आता बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे.

अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. अहेरी परिसरात फिरायला येणाऱ्या प्रत्येकाचे पाय कमलापूरकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. तसेच आता पावसाळ्याला सुरुवात येथील निसर्गरम्य वातावरण अक्कर्षक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here