घोट रेगडी मार्गावर भीषण अपघात; रेगडी येथील एक युवक जागीच ठार…

0
1338

-प्रशांत शाहा विदर्भ ब्युरो चीफ

चामोर्शी: काल ला दुपारी सुमारे दोन वाजता घडलेल्या स्कॉरपीओ व दुचाकीचा भीषण अपघातात रेगडी येथील
रवींद्र तुकाराम नेवारे वय वर्ष सुमारे 26 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच पोलिस मदत केंद्र रेगडी चे प्रभारी अधिकारी psi नंदकुमार शिंब्रे हे घटनास्तळावर दाखल झाले व वैद्यकीय अधिकारी श्री. मेश्राम साहेब यांनी अपघात ग्रस्त रविंद्र नेवारे याची जागेवर तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर सदर कार चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश मगरे करीत आहेत.

रवींद्र याचा विवाह गुंडापल्ली येथील गुरुदास ठाकरे यांची मुलगी प्रियंका नामक मुलीशी नुकताच तीन महिन्या अगोदर झाला होता. रवींद्र यांचा या दुर्दैवी मूर्त्युने नेवारे व ठाकरे परिवारावर खूब मोठा संकट कोसळून आला आहे.

घटनेची पुढील तपास पोलीस मदत केंद्र रेगडी येथील प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री नंदकुमार शिंब्रे, यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक श्री मगरे साहेब हे करीत आहेत
घटनेचा पंचनामा सहा फो यशवंत वलथरे,पो हवा जयराम तिम्मा, ना पो शी शेखलाल मडावी,पो शी नरेंद्र धोंडणे,गणेश बोरकुटे यांनी केली

घोट रेगडी या मार्गावर नेहीमी अपघात होत असल्याचे दिसून येत आहे मागील महिना भरात या मार्गावर पाच ते सहा अपघात झाले असल्याचे चित्र आहे त्यामुळे रेगडी, माडेआमगाव, विकासपल्ली ,घोट, पोतेपल्ली, निकतवाडा, नवेगाव,अशा अनेक गावातील नागरिक घोट रेगडी या रस्ताची रुंदीकरण करुन रस्त्यावर दिशा दर्शक फलक तशेच रात्री च्या सुमारास अपघात होऊ नये म्हणुन परावर्तक(रिप्लेक्टर)सुद्धा लावन्यात यावी अशी मागणी करीत आहेत.

घोट रेगडी या मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते
एटापल्ली व मूलचेरा या तालुक्यातील नागरिक जिल्हा मुख्यालय जाण्याकरिता याच मार्गाने आवागवन करत असतात
तरी वरिष्ठांनी या कडे लक्ष देऊन तात्काळ या रस्ताची दुरुस्ती करावी अशी मांगणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here