एटापल्लीमध्ये पकडली अडीच लाखांची दारू…

0
280

प्रितम गग्गुरी प्रतिनिधी

Advertisements

एटापल्ली: पोलीस गस्तीवर असताना अडीच लाख रुपयांची देशी दारू आणि वाहन असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. या वाहनातील आरोपी मात्र वाहन टाकून पसार झाले.
ठाणेदार विजयानंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पोलीस गस्तीवर असताना आलापल्ली मार्गावरील वन तपासणी नाक्याजवळ एक पिकअप वाहन उभे होते. पोलिसांची गाडी दिसताच या वाहनाच्या चालकाने वाहनासह एटापल्ली शहरातील मुख्य मार्गावरून जीवगट्टा मार्गावरील सीआरपीएफ कॅम्पपर्यंत पळ काढला. गस्तीवर असलेल्या उपनिरीक्षक रविराज कांबळे व पथकाने या गाडीचा पाठलाग केला. त्यामुळे सीआरपीएफ कॅम्पजवळ वाहन सोडून चालक व सहकाऱ्याने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. गाडीत देशी दारुचे ४२ बॉक्स होते.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here