“एक आठवण आपल्या दारी” उपक्रमा अंतर्गत विकास दुता मार्फत वृक्ष लागवड…

0
71

दिपक साबने,जिवती

त्रिशरण एनलाईट मेंट फाऊंडेशन पुणे द्वारा विकासदुत प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात “एक आठवण आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत कोरोना महामारीत मृत्यू पावलेल्या मृतकांच्या कुटुंबातील सदस्यांना भावनिक आधार देऊन त्यांच्या दारात त्यांची आठवण म्हणून आपल्या जिल्ह्यात त्रिशरण एनलाईटमेन्ट फाऊंडेशन, पुणे तर्फे “एक आठवण आपल्या दारी” उपक्रम आपल्या जिल्ह्यात सुरू झालेला असून या प्रकल्पा अंतर्गत संदीप सुखदेवे, जिल्हा समन्वयक व हिरासत मेश्राम , तालुका समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली “एक आठवण आपल्या दारी” हा उपक्रम जिवती तालुक्यात बहुंताश ग्राम पंचायत मध्ये दिनांक १० जुलै ते १५ जुलै दरम्यान नुकताच यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
कोविड – १९ च्या महामारीत कोरोना या आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ “एक आठवण आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत विकास दुत यांच्या मार्फत वृक्ष लागवड करण्यात आले.
याप्रसंगी ग्राम पंचायीतीमध्ये नियुक्त विकासदुत व त्या गावातील उपस्थित नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here