जादुटोण्याच्या संशयातून पुजाऱ्याची हत्या…

0
288

एटापल्ली : गावातील नागरिकांना जादुटोणा करीत असल्याच्या संशयातून गावातील पुजाऱ्याची अज्ञात इसमाने हत्या केल्याची घटना तालुक्यातील बुर्गी येथे १३ जुलै रोजी मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

मोका कोमटी उसेंडी (७०, रा. बुर्गी) असे हत्या झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. मोका हा गावातील नागरिकांना जादुटोणा करीत असल्याचा संशय गावातील नागरिकांना होता. या विषयावर १३ जुलै रोजी मंगळवारी दुपारी गाव मिटिंग बोलाविण्यात आली होती. तसेच काही नागरिकांनी मोकाला मारहाणही केली होती.

मोका व त्याची पत्नी गावाशेजारी असलेल्या स्वत:च्या शेतातील झोपडीत झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान, शेतावर जाऊन अज्ञात इसमांनी मोका यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here