राष्ट्रीय महामार्ग देतोय अपघाताला आमंत्रण…

0
164

प्रितम गग्गुरी (प्रतिनिधी)

देसाईगंज शहरातून साकोली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बायपास मार्गे गेलेला आहे. मागील चार वर्षापासून या बायपास मार्गाचे काम रखडले आहे व पूर्णत्वास झालेले नाही.भुयारी रेल्वे पुलाखालून शहरात जायला यायला फक्त हलक्या वाहनांना परवानगी आहे.अवजड वाहने बायपास मार्गे प्रवास करतात.बायपास मार्गाचे काम चार वर्षापासून पूर्ण न झाल्याने अवजड वाहनांना या मार्गावरून मार्गक्रमण करायला अडचणी निर्माण होत आहेत,त्यामुळे हा बायपास मार्गाचा प्रवास जीवघेणा ठरू शकतो. पावसा मुळे त्या मार्गावर चिखल व खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झालेला आहे त्यामुळे वाहनचालकांना कमालीचा त्रास होत आहे व एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.अवजड वाहन चालक नागरिकांनी अशी मागणी केली आहे की लवकरात लवकर या राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास चे काम पूर्ण करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here