आईचे काळीज भाजून खाणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा…

0
915

प्रतिनिधी दिलीप सोनकांबळे
कोल्हापुर : आईचा खून करणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दारुसाठी पैसे न दिल्याने आरोपी सुनील कुचकोरवी याने आईची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी नराधम मुलाला बेड्या ठोकल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे.

Advertisements

कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत 28 ऑगस्ट 2017 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. दारुसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन सुनीलने आई यल्लवा कुचकोरवी हिचा खून केला होता. अत्यंत क्रूर खून खटल्याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला.

Advertisements

नेमकं काय घडलं ?
कवळा नाका येथील वसाहतीत सुनील कुचकोरवी राहत होता. 28 ऑगस्ट 2017 रोजी आईने दारुसाठी पैसे न दिल्यामुळे त्याचा वाद झाला. त्यानंतर आईची निर्घृण हत्या करुन त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. सुनीलला जन्मठेप द्यायची की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला होता. न्यायालयाने सुनीलने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे सांगत फाशीची शिक्षा सुनावली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here