Homeचंद्रपूरजिवतीरूद्रा प्रतिष्ठान जिवती तर्फे कोरोना योद्धा व अतुलनीय शौर्य दाखविलेल्यांचा सत्कार करून...

रूद्रा प्रतिष्ठान जिवती तर्फे कोरोना योद्धा व अतुलनीय शौर्य दाखविलेल्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले…

दिपक साबने,जिवती

जिवती शहरात प्रथमच रुद्रा प्रतिष्ठान जिवती यांच्या वतीने कोव्हीड योद्धा यांचे सन्मान करण्यात आला. शहरात नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या रूद्रा प्रतिष्ठान यांचे कडून मान्यवरांचे पुष्प गुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांच्या निमित्ताने 18 ते 44 वयोगटातील लोकांना कोरोणा लसीकरण व हत्ती रोग व फायलेरिया गोळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती च्या वतीने देण्यात आले.
चिमूर वनक्षेत्रात सेवा देत असताना आपल्या सहकार्यावर झालेला हल्ला आपला जीव धोक्यात टाकून परतवून लावून सहकार्याचा जीव वाचवल्याबद्दल त्यांनी दाखवलेले धाडस व शौर्य अतुलनीय असल्याने त्यांचा व कोरोना सारख्या जीवघेण्या महामारीच्या काळात जिथे रुग्णाचे जवळचे नातेवाईक पाठ फिरवतात तिथे रुग्णाचे मनोबल वाढवून त्यांना आपली सेवा देणारे आणि आपल्या कार्यातून माणुसकीचे दर्शन घडवून आणणारे जन सेवक यांचा सत्कार होणे हे अगत्याचे होते. ही गोष्ट ध्यानी धरून रुद्रा प्रतिष्ठान यांनी वरील कार्यक्रम घडवून आणला.
या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश देवकते, उपसभापती पंचायत समिती हे होते तर उद्घाटक, अंजना ताई भिमराव पवार सभापती पंचायत समिती या होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती ऑस्कर साहेब,विस्तार अधिकारी, पंचायत समिती जिवती, जगन्नाथ गारूळे साहेब बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती जिवती, रामदास आनकाडे तालुका वैद्यकीय अधिकारी, मेहबूब भाई शेख, भीमराव पवार, डॉक्टर अंकुश गोतावळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सत्कार मूर्ती महेश देवकते
उपसभापती पंचायत समिती जिवती,
परमेश्वर तंबुळगे STPF वनरक्षक चिमूर, संभाजी बळदे STPF वनरक्षक चिमूर, विजय गोतावळे सामाजिक कार्यकर्ता आणि रुग्णसेवक जिवन तोगरे (पत्रकार) इत्यादी मान्यवरांचा सत्कार करून प्रतिष्ठान तर्फे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी रुद्र प्रतिष्ठान जिवती
सुनील जाधव अध्यक्ष, मनोहर पानपट्टे सचिव, विलास वावरे उपाध्यक्ष, व्‍यंकटी तोगरे सहसचिव, विलास कळसकर कोषाध्यक्ष, नामदेव मुंडे, वाकू राम सोन्नर, दत्ता जाधव
कृपा नंद गभणे, अशोक मोरे, अंबादास वाघमारे, पुंडलिक गिरमाजी, राजेश राठोड यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमा चे सूत्र संचालन राजेश राठोड यांनी तर प्रास्ताविक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सुनील जाधव सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार वाकुराम सोन्नर सर यांनी मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!