प्रीतम गग्गुरी प्रतिनिधी
अहेरी उपविभागतील प्रलंबित एटापल्ली तालुका सुरजागड लोह, प्रकल्प व स्थानिक रोजगार निर्मिती याकरीता सरकारला भाग पाडू अशी माहिती जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख किशोर चंद्रकांत पोतदार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. नुकत्याच काही महिन्यापूर्वी लोहा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आलेले आहे परंतु ते काम त्रिवेणी ह्या कंपनीला देण्यात आलेले असून त्या ठिकाणी काम करणारे मजूर व कर्मचारी यांची नियुक्ती परराज्यातील छत्तीसगड, तेलंगाना आंध्र प्रदेश येथील व्यक्तींना देण्यात आलेली आहे. त्यावर शिवसेना जिल्हा गडचिरोली खेद व्यक्त करीत आहे. महाराष्ट्रासह जिल्ह्यातील मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, स्थानिक युवक यांना प्रथम प्राधान्य देऊन लोह प्रकल्प हा जिल्हास्थित कोंनसरी येथील नियोजित जमिनीवर उभारण्याकरिता सरकारला भाग पाडू अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. जिल्ह्यात कोणतेही दुसरे उद्योग नाहीत, कोणत्याही प्रकल्पाविषयी अजून पर्यंत उभारणी नाही तत्पश्चात महाराष्ट्रातील उद्योगविरहीत व नक्षलवाद ग्रस्त जिल्हा अशी ओळख निर्माण झालेली असून ती सदर लोह प्रकल्पाच्या उभारणीतून मिटल्या जाईल, लोह
प्रकल्प निर्मितीमुळे स्थानिक युवांच्या बेरोजगारी प्रश्ना सह नक्षलवाद यावरसुद्धा आळा घालण्यासाठी मदत होणार असल्याने प्रकल्पाविषयी जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सदर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
सदर पत्रकार परिषदेला सहसंपर्कप्रमुख विलास भाऊ कोडापे, अहेटी जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख, गडचिरोली जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, अहेटी उपजिल्हाप्रमुख अरुण भाऊ धुर्वे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास भाऊ ठोंबरे, संघटक बिरजू भाऊ गेडाम, महिला आघाडी तालुकाप्रमुख तुळजा तलांडे, पौर्णिमा इष्टाम महिला आघाडी, मडावी ताई, दिलीप सुरपाम, सुभाष घुटे, राजू येणगंटीवार, भास्कर पानेम, मधुकर पानेम, अजयभाऊ तसेच समस्त शिवसैनिक तथा पदाधिकारी उपस्थित होते. सदर पत्रकार परिषदेमध्ये भास्कर पानेम व मधुकर पानेम यांना संपर्कप्रमुख यांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला.