गोंडपिपरी- तालुक्यातील धाबा-पोडसा मार्गावरील पुलांचे बांधकाम सूरू आहे. वाहतूकीसाठी तातत्पुरता मार्ग बनविण्यात आला. आज दि.30 जून रोज बुधवारला झालेल्या दमदार पावसामुळे सकमुर गावाजवळील पुलावरून पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला. परिणामी वाहतूक ठप्प झाली आहे.
अवघ्या पंधरा दिवसात तिसऱ्यांदा हा मार्ग बंद झाला आहे. गोंडपीपरी तालुक्यातिल विविध भागात रस्ते बांधकाम सूरु आहे. अश्यातच आज दि ३० जून रोज बुधवारला झालेल्या मुसळधार पावसाने बांधकाम सुरू असलेल्या व वाहतुकीसाठी बाजूला तात्पुरता बांधण्यात आलेल्या पुल सुद्धा पाण्याखाली आल्याने सदर मार्ग बंद झाला आहे. कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या नागरिकांची सदर मार्ग बंद झाल्याने मोठी फजिती झाली आहे.