ब्रेकिंग: तीन वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप; दोन जखमी…चिमूर तालुक्यातील घटना..

0
518

चिमूर: तालुक्यात 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप झाल्याची माहिती समोर आली आहे. वाघांना गावाजवळून हुसकावून लावण्यासाठी काही गावकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यामध्ये एक गावकरी जखमी झाला. याशिवाय STPF दलातील एक जवानही यामध्ये जखमी झाला. वाघांच्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाचे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.

संबंधित घटना ही चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे घडली. पळसगाव येथील तलावाजवळ आज (23 जून) 3 वाघ असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर या वाघांना तिथून हुसकावून लावण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप झाली. यामध्ये एक गावकरी जखमी झाला. त्यांचं नाव चरणदास बन्सोड (वय 56) असं आहे

व्याघ्र संरक्षण दलाचा जवान जखमी

गावकरी आणि वाघ यांच्यात झडप सुरु असल्याची माहिती व्याघ्र संरक्षण दलाला (STPF) मिळाली. STPF जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी वाघाने STPF जवान सुनील गज्जलवार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. सध्या वाघ त्याच तलावाजवळ असून स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here