कोरपना – दुचाकीनी दुचाकीला सामोरा समोर धडक दिल्याने तीन ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोरपना – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पारडी येथील शिव मंदिर जवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, सुपर स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच ३४ एन ५१३५ ही कोरपना कडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या यामा दुचाकीला धडकली. यात सुपर स्प्लेंडर वरील बहादू लच्चू सोयाम (३७) , विश्वास भुतडे (४०) रा. येलापुर व यामा दुचाकीवरील राजू अर्जुन सोलंकी (३४) रा.इदरवेल्ली हे जागीच ठार झाले. तर मुस्तकीन शेख (१८) रां. इदर वेल्ली हा गंभीररित्या जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेहांना ग्रामीण रुग्णालयात उर्वरित तपासणीसाठी हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अरुण गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिस करीत आहे.
Advertisements
ब्रेकिंग: दुचाकीची दुचाकीला धडक ; तीन ठार , एक गंभीर जखमी…कोरपना तालुक्यातील घटना
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements