Homeचंद्रपूरगोंडपिंपरीचंद्रपुर महामार्गावरील अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू...

चंद्रपुर महामार्गावरील अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू…

शरद कुकुडकर (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)

गोंडपिपरी – चंद्रपुर महामार्गावरील वनविभागाच्या तलावाजवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू झाला असून सदर घटना आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली.

गोंडपिपरी शहराला वन हद्द सीमा लागून असल्याने अनेक वन्यजीवांचा गावा लगतच असलेल्या वन तलावाजवळ वावर असतो. अशातच आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास गोंडपिपरी – चंद्रपूर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मार्गक्रमण करणाऱ्या चितळाला जबर धडक दिल्याने या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने धाव घेतली असून मृत्त चितळाला शवविच्छेदन करीता पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले असून अज्ञात वाहनाच्या शोध सुरू असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!