Homeचंद्रपूरगोंडपिंपरीकृषी संजीवनी मोहीम अंतर्गत मौजा अडेगाव येथे कृषी विषयक कार्यक्रमाचे आयोजन...

कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत मौजा अडेगाव येथे कृषी विषयक कार्यक्रमाचे आयोजन…

शरद कुकुडकर (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)

गोंडपीपरी तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम दि. 21 जून ते 1जुलै 2021 पर्यन्त राबविण्यात येत आहे. अश्यातच आज दिनांक 22 जून रोज मंगळवारला गोंडपीपरी तालुक्यातील मौजा अडेगाव येथिल श्री.चंपत देवाजी ठाकूर यांच्या शेतात कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांना सोयाबीन बियांनाची बीज प्रक्रियाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.यामध्ये प्रथम बुरशीनाशक,नंतर किटकनाशक, नंतर जैविक जिवाणू संवर्धक रायझोबियम, इत्यादी.ची बीज प्रक्रिया करून करण्यात येऊन पेरणी संदर्भात मार्गदर्शन करून विविध खतांच्या मात्रा कश्या द्याव्यात या बद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. निबोळी अर्क, दशपर्णी अर्क,ऍझोला युनिट, याबद्दल माहिती मार्गदर्शन करून त्याचा वापरा साठी स्वतः शेतकऱ्यांनी घरीच हे सर्व तयार करावेत असे आवाहन करण्यात आले.
यावेळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोलहाईत साहेब,मंडल कृषी अधिकारी धाबा,टोनगलवार साहेब,कृषी पर्यवेक्षक , अडेगावच्या सरपंचा सौ.रेखाताई चौधरी,उपसरपंच विजय चौधरी,कृषी मित्र भगिरथ नागापुरे,यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक पी.पी.पेंदोर यांनी आयोजित केला होता.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!