नागभीड: तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत वाढोणा लगत आकापुर येथे नेहमीप्रमाणे गाई बैल चराई साठी नेला असता खंडू भानुजी कुंभरे वय 65 दबा धरून ठेवलेल्या वाघाने गुराख्या वर हल्ला केला. ही घटना शनिवारी 4 वाजताच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच लगेच वन विभागाचे कर्मचारी व तळोधी पोलीस स्टेशन चे पोलीस घटनास्थळी पोहोचले . मोक्का पंचनामा करून विच्छेदन करीता नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
Advertisements