गोंडपीपरी तालुक्यातील अडेगाव येथिल कवडू कोडापे यांच्या घरालगतच्या विहिरीत नाग साप असल्याचे गावातील महिलांच्या निदर्शनास आले.
सर्प मित्रांना विहिरीत साप असल्याची माहिती देण्यात आली. सोनू वाकुडकर, आणि प्रदीप नागुलवार ह्या सर्प मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहिती वरून ते व त्यांचे संवगडी विहिरीत उतरले आणि सापाला शोधायला सुरवात केली असता विहिरीत एका गोट्याच्या खपालित नाग साप असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले
असता त्यांनी आपली युक्ती ,आणि शक्तीच्या जोरावर सापाला विहिरी बाहेर काढन्याचा प्रयत्न करीत होते.
पण रात्रीची वेळ असल्याने व अंधार असल्याने सापाला पकडने त्यांच्या समोर आव्हानच होते! .टॉर्च, लावून अंधाऱ्या रात्रीत सापाला पकडणे त्यांच्या पुढे मोठे आव्हान होते.परंतु त्यांनी हार न मानता अखेर पर्यन्त प्रयत्न सुरू ठेवला तब्बल तीन तासाने त्यांचा प्रयत्नाना यश आले. त्यांनी त्या सापाला विहिरीबाहेर काढून जीवनदान दिले. *शरद कुकूडकार* प्रतिनिधी भंगाराम तळोधी
Advertisements
अखेर, सर्प मित्राने नागसापाला दिले जीवनदान!
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements