विरूर स्टे इथे covid सेंटर चे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन…

638

राकेश कडुकर (राजुरा ग्रामीण प्रतिनिधी)
विरुर- दिनांक ११-६-२१ ला शुक्रवार रोजी २ चे सुमारास अशाधाम हॉस्पिटल विरूर स्टे येथे कोविड सेंटर चे उद्घाटन करण्यात आले आहे. श्री आमदार सुभाष जी धोटे सर यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर तहसीलदार गडे सर, SDM खलाते सर, BDO रमावे सर, ठाणेदार श्री कृष्णा तिवारी साहेब, माजी सभापती कुंदा जेणेकर, सरपंच भाग्यश्री आत्राम, ग्रामसेवक नैताम, हवालदार प्रवीण कामडे, काँग्रेस नेते अजय रेड्डी अक्केवरजी, इरफान सय्यद, सोनू सिंग टाक व गुरूद्वारा अध्यक्ष सरदार बवेजा सर, प्रवीण चिडे रिटायर शिक्षक पोवार सर यांच्या उपस्थितीत अशाधाम हॉस्पिटल चे डॉक्टर अलिजा बेद प्रशासक व मेडिकल ऑफिसर आलिजा जोश व सर्व कर्मचारी यांचा सहकार्याने कोविड सेंटर चा उद्घाटन करण्यात आले. कोविड सेंटर सुरू करण्यास महत्वाची भूमिका म्हणजे श्री अजय रेड्डी जी इरफान सय्यद अककेवर जी सोनु सिंग टाक यांनी आमदार जी सुभाष धोटे सर यांना निवेदन देऊन आणि त्यांचा सोबत असून विरूर स्टे इथे कोविड सेंटर सुरु करण्यास मदत केली. काही दिवसा पुर्वी ठाणेदार श्री कृष्णा तिवारी साहेब यांनी व आपल्या कर्मचारी सह ७० हजार रू. ची मदत या कोविड सेंटर ला केली आणि विरूर स्टे चे सर्व व्यापारी यांनी ३ लाख पर्यंत ची सामग्री घेऊन कोविड सेंटर ला दिली व आज शुक्रवार ला आमदार सर श्री सुभाष धोटे सर यांनी स्वतः ५० हजार रू.ची मदत केली या साठी विरूर स्टे इथले सर्व गावकरी यांनी मनःपूर्वक आभार प्रकट केलें आणि आम्ही पत्रकार बंधू कडून मनापासून आभार प्रकट केले.