गोंडपिपरी: तालुक्यातील पोडसा गावातील ग्रामपंचायतचे सदस्य सुधाकर अलगमकार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचाराकरिता नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या १४ दिवसांपासून ते ऑक्सिजवर होते. अश्यातच आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधन मूळे त्यांचा कूटूंबावर खूप मोठ संकट कोसळले असून त्यांच्या घरात पत्नी, आई आणि दोन मुले आहेत.