आरमोरी जवळील शिवणी (वघाळा ) येथील वासुदेव पांडुरंग पत्रे यांचे काल दि.५ जून रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात १ मुलगा व २ मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे तालुकाप्रमुख या नात्याने वासुदेव पत्रे यांनी आरमोरी भागात राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार प्रसार केला. अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या आॕगष्ट क्रांतीज्योत यात्रेत ते सहभागी होत असे. आपल्या शिवणी गावात सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून बाल मनावर उत्तम संस्कार देण्याचे कार्य त्यांंनी केले. त्यांचा साधेपणा, मितभाषी आणि काटकसरी स्वभाव असल्याने ते कुठेही मिसळत. सहज संवाद साधत.
त्यांच्या रूपात आम्ही एक निष्ठावंत श्रीगुरूदेव प्रचारक आम्ही हरवून बसलो आहे अशा शब्दात शोकसंवेदना जिल्हाप्रमुख डाॕ.शिवनाथ कुंभारे आणि ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर व्यक्त केल्या.
Advertisements
श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे आरमोरी तालुकाप्रमुख वासुदेव पत्रे यांचे निधन…
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements