साहित्यिकांची लेखनी ठरताहेत जनजागृतीचे माध्यम… कोरोना लसिकरणासाठी कवितेतून संदेश : फिनिक्सने काढली दोन पुस्तके

0
61

चंद्रपूर:कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या सोबतच आता आरोग्य ही मुलभूत गरज बनली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात समज-गैरसमज व भितीदायी वातावरण असतांना जिल्ह्यातील साहित्यिकांनी कोरोनाविरुद्ध युद्ध पुकारुन लेखनीतून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. वेदनांना कवींच्या आशेच्या शब्दांचा आधार दिलासा देणारा ठरत आहे.

Advertisements

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात फिनिक्स साहित्य मंच ,चंद्रपुर व पंचायत समिती गोंडपिपरी द्वारा जिल्ह्यातील लेखक, कवींना कोरोना जनजागृतीसाठी लिहीते केले. साहित्यिकांचे शब्दांना जनजागृतीचे माध्यम बनवले. ‘संदेश कोरोना लसिकरणाचा’ या शिर्षकाखाली तीन आॅनलाईन कविसंमेलने पार पाडली. समाजमाध्यमातून कवितांना व्यापक प्रसिद्धी देवून जिल्ह्यातील कवी, लेखकांना कोरोना योद्ध्याची भुमीका देवून जनजागृती करवून घेतली.

Advertisements

सहा.गटविकास अधिकारी धनंजय साळवे, फिनिक्स साहित्य मंचाचे अध्यक्ष नरेशकुमार बोरीकर, विजय वाटेकर यांनी ‘आरोग्यावर बोलू काही’ या कोरोनाविरुद्ध एकुण ५२ जनजागृतीच्या कवितांचे संपादन पुस्तकरुपात केले. कोरोना लसिकरणाबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी नुकतेच ‘पुन्हा श्वास घेण्यासाठी’ या १९ कविंच्या कवितांचे पुस्तकरुपाने फिनिक्सतर्फे कवी धनंजय साळवे, नरेशकुमार बोरीकर, अविनाश पोईनकर, गोपाल शिरपूरकर यांनी संपादन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले व श्याम वाखर्डे,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साहित्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपणा-या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच कपीलनाथ कलोडे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.),शेषराव बुलकुंडे,गट विकास अधिकारी ,गोंडपिपरी तथा डाँ.हेमचंद कन्नाके,उरो तज्ञ तथा निवासी वैद्यकीय अधिकारी सा.रुग्नालय,चंद्रपूर यांनी लोकजागृती करीता पुस्तकाला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्ह्यातील कवी सुरेंद्र इंगळे, संतोषकुमार उईके, जयवंत वानखेडे, मिलेश साकुरकर, सुनिल बावणे, अरुण घोरपडे, पंडीत लोंढे, राजेंद्र घोटकर, नरेंद्र कन्नाके, राजेंद्र पोईनकर, सुधाकर कन्नाके, संभाशीव गावंडे, बी.सी.नगराळे, शितल धर्मपुरीवार, रोशनकुमार पिलेवान, प्रदीप देशमुख, किशोर चलाख, अरुण झगडकर, दुशांत निमकर, मीना बंडावार, प्रविण आडेकर, दीपक शीव, अमीत महाजनवार, नितीन जुलमे, सुनिल कोवे, सुनिल पोटे, वैशाली दिक्षीत, चंद्रशेखर कानकाटे, ईश्र्वर टापरे यांनी कोरोना जनजागृती व लसीकरणासाठी लेखन करुन योगदान दिले आहे.

 

 

सध्याच्या काळात जिल्ह्यातील कवी, लेखकांची लेखणी कोरोना निर्मूलन व लसीकरणासाठी जनजागृतीचे प्रभावी माध्यम असून यातून जनतेतील गैरसमज दूर होवून आशावाद निर्माण होईल. या उपक्रमातील कविता व संपादित पुस्तके समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक आहे

– धनंजय साळवे
संयोजक तथा सहा.गट विकास अधिकारी, गोंडपिपरी

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here